बोर्ली पंचतन बाजारपेठ उत्सफुर्तपणे बंद...

दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ दुकाने, रिक्षा, मिनीडोअर यांचा कडकडीत बंद.

श्रीवर्धन दि. १६ । संतोष रेळेकर 

               जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये सी आर पी एफ जवानांच्या बस वर भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना बोर्ली पंचतन मधील ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली तर सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फर्तपणे दुकाने, रिक्षा संघनांनी रिक्षा व मिनीडोअर संपुर्ण बंद ठेवून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला.

               जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे किमान 42 जवान शहिद झाले आहेत. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या बसवर धडकावून हा स्फोट घडवून आणला. या भयंकर कृत्याचा निषेध सर्व भारतभर सुरु असून या कृत्याचा बदला भारतीय सैन्याने घ्यावा व भारत सरकारने सैन्याला पुर्णत: मोकळीक द्यावी असा सुर सर्वत्र उमटत आहे. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन मध्ये काल शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला तर आज सकाळी काही व्यापारी वर्गाने दुकाने चालू केली होती परंतू 11 नंतर व्यापारी वर्गाने स्वत:हून दूकाने बंद केली तर म्हसळा, दिघी व श्रीवर्धन मार्गावर चालणाऱ्या मिनीडोअर व रिक्षा पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. तर अत्यावश्यक सेवेमध्ये मेडीकलच्या दुकानदारांनी काळ्या‍फिती लावून दहशतवादी हल्याचा निषेध नोंदविला. एकंदरीत पुलवामा हल्याच्या निषेधार्थ बोर्ली पंचतन ची जनता देखील निषेध नोंदविण्यात अग्रेसर होती.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा