श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पसंती ; ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली पर्यटकांची रेलचेल



प्रतिनिधी श्रीवर्धन
पावसाळ्यानंतरचा पर्यटन हंगाम सुरू होत आहे . मागील आठवड्यापासून सलग सुट्ट्यानिमित्त व फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनार्यांनी भुरळ पाडलीय . नारळी - फोफळीच्या बागा , रुपेरी वाळू निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा यामुळे श्रीवर्धन मधील समुद्रकिनारे पर्यटकांचे फेव्हरिट डेस्टिनेशन ठरत आहे गणेशोत्सवानंतर खास पर्यटनाची चाहूल लागते . चार महिन्यानंतर पर्यटकांची रायगडच्या किनार्यांवर हळूहळू् गर्दी दिसत आहे.
पावसाळी दिवसात कामकाज आटपून घरात पडून राहणारा हौशी तरुण ' आपल्या मित्र मंडळीसह तर आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला येत असल्याचे दिसत . पुणे , मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनार्यांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत . गेल्या रविवार पासून श्रीवर्धन , दिवेआगर सह हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर शेकडो पर्यटकांनी भेट दिली . इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्टचा ' आनंद पर्यटक घेत आहेत . कोंकणातील सुंदर वातावरण मुळे इथून पाय निघत नाही असे पर्यटक सांगतात . ऑक्टोबर हिट कमी करण्यासाठी पर्यटक समुद्रकिनारी येऊ लागलेत . आता पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे तालुक्यातील किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी आतुर आहेत

मासळीचा स्वाद...
गत काही वर्षात श्रीवर्धन मधे देशी , विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी पर्यटन हंगामा बरोबर संपूर्ण वर्षभर दिसून येते . मोहिनी घालणारे निसर्ग सौंदर्य | भुलवणारे समुद्र किनारे किल्ले रायगड दर्शन , स्कुबा , वॉटर स्पोट्र्स याच्या जोडीला जिभेवर रेंगाळणार्या मासळी जेवणाचा स्वाद आणि हे सर्व काही पर्यटकांच्या खिशाला परवडणारे पर्यटन श्रीवर्धनला पर्यटकांचा ओढा वाढवण्यास कारणीभूत ठरते . 


रोजगार वाढला...
पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे . समुद्रकिनान्यावर पर्यटकांची ही रेलचेल नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत अशीच कायम राहणार 


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा