म्हसळा : निकेश कोकचा
शेतकरी वर्गाला नवीन दिशा, प्रेरणा देणारी आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे शेतात प्रगत शेती करून प्रगती केली असल्याने त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार किंवा शाबासकीची पाठीवर थाप मारल्यास त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत होतो हि शाबासकी देण्याचे काम रायगड जिल्हा व तालुका जिल्हा प्रेस क्लब गेली अनेक वर्षे करीत आहे.प्रेस क्लब हे करीत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत म्हसळ्याचे तहसिलदार रामदास झळके यांनी व्यक्त केले. ते रायगड प्रेस क्लब संचालित म्हसळा प्रेस क्लब ने आयोजित केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान शेताचं बांधावर या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
रायगड जिल्हा प्रेस क्लब,संयुक्त म्हसळा तालुका प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांना त्यांचे शेताचे बांधावर जाऊन सन्मानित करण्यात येतो त्यानुसार या वर्षी म्हसळा शहरातील प्रगत शेतकरी श्री सुरेश उर्फ बाबा करडे आणि केलटे येथील प्रगत शेतकरी श्री दामाजी पवार यांचा सत्कार तालुक्यातील मान्यवरांचे हस्ते त्यांचे शेताचे बांधावर करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सभापती उज्वला सावंत,पंचायत समितीच्या सदस्या छाया म्हात्रे,माजी सभापती महादेव पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,तालुका अध्यक्ष रा.काँग्रेस समीर बनकर,भाजप ता.अध्यक्ष शैलेश पटेल,उदय कळस,वनपाल बाळकृष्ण गोरणाक,सुर्यतल,पवार,बनसोडे,मोरे,मनोज देशपांडे,समाज सेवक चंद्रकांत कापरे, रेखा धारिया,भालचंद्र करडे,तुकाराम पाटील,आदर्श शेतकरी सुरेश करडे,योगेश करडे,यतीन करडे,श्रीकेश पाटील,हिरामण कांबळे आदी मान्यवर तर केलटे येथील आदर्श शेतकरी दामाजी पवार, गाव अध्यक्ष अनंत धाडवे, महिला अध्यक्षा बायमा कासरूंंग,पोलीस पाटील किसन पवार, किरण पालांडे,केंद्र प्रमुख सुनिल पवार, तंटामुक्त अध्यक्ष गोपाळ काप,राजु राठोड, निळाक्षी कासरूंंग आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन तंत्रज्ञान वापरून तालुक्यातील डोंगर भागात प्रगत शेती केल्यास त्यांचा आदर्श अन्यजन घेतील आणि तरुण पिढीचा कल मोठ्या संख्येने शेती करण्याकडे वळेल. योगेश आणि यतीन करडे यांनी वडिलोपार्जित डोंगराच्या 40 एकर वरकस जमिनीत फलबागायत तयार करून म्हसळा शहरात आदर्श आणि शाश्वत शेती विकसीत केली आहे तर दामाजी पवार,पत्रकार महेश पवार यांनी नागली, भात,वरी तसेच भाजीपाला पीक घेत नवतरुणांपुढे आदर्श ठेवला असल्याने रायगड जिल्हा व तालुका प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा शेताचे बांधावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
إرسال تعليق