●तहसील कार्यालयाला दिले लेखी निवेदन...
●नोटीस समजून कारवाई करा नाही तर पुढील परिणामाला सामोरे जा - म्हसळा अवजड वाहतूक सेनेचा इशारा
म्हसळा : महेश पवार
म्हसळा दिघी रस्ताम्हणजे मृत्यूचा सापळा कारण त्या रस्त्याची दयनिय अवस्था पोर्टच्या अवजड वाहनांनी केली आहे वेळोवेळीं दिघी पोर्ट प्रशासनाला या विषयी पत्रव्यवहार केला आहे . परंतु त्या पत्रव्यवहाराला आजपर्यंत दिघीपोर्टने आणि संबधीत प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे . अनेक वेळा उपोषण केले आहेत . मोर्चा आंदोलन केली आहेत परंतु या कंपनीला कोणत्या प्रकारचा आजपर्यंत चाप बसलेला नाही त्यामुळे शेवटचा अंत म्हणून हा आमचा पत्र आहे या प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करा नाही तर येत्या १५ ऑगस्टला म्हसळा तालुका अवजड वाहतूक सेना , युवा सेना हे रस्ता रोको आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे या संबधी लेखी निवेदन म्हसळा तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले निवेदन समयी श्रीवर्धन ड़िवायएसपी . पवार पोलिस निरीक्षक कोल्हे , गट विकास अधिकारी प्रभे , क्षेत्र संघटक रवींद्र लाड, नंदुजी शिर्के, अनंत भाई कांबळे, श्याम कांबळे, महादेव पाटील, अमित महामुणकर संतोष सुर्वे, नितीन पेरवी, गणेश नाक्ती ल, नरेश मेंदाडकर, अक्रम साने यशवंत गाणेकर प्रदीप शतकर गोविंद कांबळे दिपल शिकं वरंद्र सावंत जैद , प्रवण पादुकले . महादेव कांबळे , रमेश डलकर , बाळकृष्ण म्हात्रे , संतोष रेवाळे आदि कार्यकरते हजर होते . या विषयी सविस्तर वृत्त , या विषयी जिल्हा अधिकारी असे की अलिबाग यांना २ जुलै रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते , तर पोलीस अधिक्षक रायगड यांना २ जून रोजी पत्र देण्यात आले होते श्रीवर्धन उपविभाग अधिकारी यांना देखील पत्र देण्यात आले होते परंतु प्रांत वगळता कुणाचाही आजपर्यंत लेखी उत्तर आलेला नाही त्यामुळे आमचा हा शेवटचे व अंतिम पन्न समजून कार्यवाही करा नाहीतर येत्या १५ ऑगस्ट रोजी रस्ता आंदोलन केला जाईल याचे भान ठेवा अशा प्रकट शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे त्यामुळे दिघी पोर्ट प्रशासन आणि संबधीत यंत्रणा यांना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे . या रस्त्यावर शेकडो अपघात झाले आहेत स्थानिक सत्ताधार्यांचे हात चिखलाने माखले आहेत संबधीत प्रशासन हा कंत्राटदार च्या ताटाखालचा मांजर झाले आहे त्यामुळे ह्या अवैध वाहतुकीला वाली कोण ? असा सवाल जनता करत आहे..
आमच्या मागण्या पूर्ण करा..
दिघी म्हसळा माणगाव रस्ता जो पर्यंत सुस्थीतीत होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक थांबविण्यात यावी . दिर्घपोर्ट कंपनीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे . अवजड वाहतुकीची वेळ रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत असावी . ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी . पर्यायी रस्त्यासाठी शेतकन्यांची संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा . रस्त्यालगत ठीक ठिकाणी सुलभ सौचालयाची व्यवस्था करावी .
आम्ही आज पर्यंत प्रशासनाच्या चाकोरीत राहुन सयंमतेने संबधीत प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले आहे . आताही जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक , परिवहन कार्यालय , स्थानिक पोलिस स्टेशन , प्रांत कार्यालय , तहसिल यांना निवेदन दिले आहे परंतु हे शेवटचे पत्र आहे . त्याची कारवाई प्रशासनाकडून झाली नाही तर येत्या स्वातंत्र्यदिन आम्ही रास्ता रोको आंदोलन केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही . आणि होणार्या परिणामाला संबधित प्रशासन जबाबदार असणार आहे
- रविंद्र लाड क्षेत्र संघटक श्रीवर्धन मतदार संघ
शिवसेना प्रत्येक विषयावर आक्रमक असते आणि यापुढे राहणार आहे , परंतु आम्ही शांत आहोत याचा गैरफायदा संबधित प्रशासनाने घेऊ नये . वेळ आली तर सेनेच्या भाषेत उत्तर देत दिघी पोर्ट बंद पाडू.
- श्यामभाई कांबळे , अध्यक्ष , अवजड वाहतूक सेना म्हसळा
إرسال تعليق