प्रतिनिधी : म्हसळा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागा तर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीस तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी गुरूवंदना करणारे स्वागतगीत सा्दर केले त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन वंदन केले आणि त्याचे अशिर्वाद घेतले तर प्रथम वर्षे कला शाखेतील विद्यार्थ्यांनी कु. मयुरी मेकडे हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीत विद्यार्थी जीवनात गुरुचे असलेले महत्त्व वर्णन करणारे अभ्यासपुर्ण भाषण केले तर कु.दिपाली नाक्ति श्री.मोहन जाधव कु.विनिता जाधव याविद्यार्थ्यानी गुरुंचे महत्व वर्णन करणाऱ्या स्वरचित कविता सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमच्या अनुषंगाने प्रा.टेकळे डॉ. सिद्दीकी डॉ. बेंद्रे प्रा.माशाले यांनी यथोचित विचार मांडताना स्वतःच्या शैक्षणिक जीवनातील शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन.राघव राव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोणत्याही प्रतिभा संपन्न व्यक्तीस वंदन केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो तसेच वंदन का करावे आणि कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना उपदेश केला आणि विद्यार्थ्यांनां त्याच्या भावी आयुष्यात खुपखुप यश प्राप्त होवो असा आशिर्वाद दिला कार्यक्रमाच्या शेवटी कु.अस्मिता जाधव या विद्यार्थीनीने काव्यपंक्तीच्या साह्याने सर्वाचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. शिरीष समेळ यांच्या मार्गदर्शन खाली श्री. मोहन जाधव श्री. राजेश गोविलकर, अक्षय बांद्रे , निखिल कदम ,ओकार खोत या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
إرسال تعليق