श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांचे मुख्य पीक भातशेती हेच आहे . कारण पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी मोठी धरणे नसल्यामुळे उन्हाळी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही . ज्या शेतकर्यांना विहिरीच्या किंवा नदीच्या पाण्याची सोय आहे , ते शेतकरी उन्हाळी मोसमात भाजीपाला चांगल्या प्रमाणात पिकवितात . पण मार्च महिन्यानंतर पाण्याचे स्रोत बंद झाल्यानंतर कोणताही पर्याय नसतो . तालुक्यातील भात लावणीची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत . तालुक्यातील एकुण लागवड क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर भातपिक लावण्यात येते . तर उर्वरीत ५० टक लागवड क्षेत्र ओसाड टाकण्यात येते . स्थानिक नागरिकांचे शहराकडे होणारे स्थलांतर हे भातशेती ओसाड जाण्यामागचे मूळ कारण आहे काही शेतकरी भातशेतीची कापणी झाल्यानंतर वाल , मुग उडीद चवळी अशी पिके घेतात . पण मुख्य शेती ही भातशेतच आहे . भातशेतीमध्ये पाणथळ व उखारु असे दोन प्रकार असतात . पाणथळ शेतीमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी साठून राहते . पण उखारु शेतीमध्ये कितीही पाऊस पडला तरी पाणी साठून राहात नाही . उखारु शेतीची भातलावणी पाऊस सुरु असतानाच करावी लागते . मात्र पाणथळ शेतजमीन पाऊस नसतानासुद्धा भात लावणी करता येते . मागील आठवड्यात जोरदार पाऊस सुरु होता . त्यावेळी उखारु शेती असलेल्या शेतकर्यांनी आपल्या लावण्या उरकून घेतल्या .
लाकडी नांगर नामशेष होण्याच्या मार्गावर....
नोकरी धंद्यासाठी मुंबई , पुण्यासारख्या शहरात अनेक स्थानिक नागरिक गेल्यामुळे गावाकडे असलेली शेती करण्यात त्यांना रस राहिलेला नाही . शेती करण्यासाठी गावाकडे आल्यानंतर शेतमजूर वेळेवर मिळत नाही . नांगर हाकलणे नामशेष होत चालल्यामुळे नांगर मिळणे अवघड होऊन बसते टंक्टर मिळणेसुध्दा मुश्कील होते मिळाला तरी वेळेवर मिळत नसल्यामुळे रजा घेऊन शेती लावण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांचे हाल होतात पंचवीस वर्षांपूर्वी या गावांमध्ये ७० ते ८० नांगर होते . त्या गावामध्ये एक किंवा दोन नांगर पाहायला मिळतात . काही गावामध्ये डोंगराळ भागात नाचणी व वरीची पिके घेतली जायची पण आजमितीला ही शेतीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
إرسال تعليق