केल्टे : विनायक जाधव
सुमारे पस्तीस घरांची बौध्दवाडी आणी पाच घरांची रोहीदास वाडी दुथडी भरून वाहणा-या ओढ्यामुळे अलीकडे आणि पलीकडे स्वरूपात विभागली असून दोन्ही बाजुस निम्म्या प्रमाणात असा वीस-वीस घरांचा उंबरठा आहे.
सदर वाडीतून वाहणारा ओढा तीव्र उताराचा असून पावसाळ्यात वाहणारे पाणी आक्रमक स्वरूपाचे असते. यामुळे अलीकडचा आणी पलीकडचा संपर्क तुटतो.
ही समस्या मिटविण्यासाठी तीस वर्षापुर्वी तत्कालीन गावच्या कार्यकर्त्यानी सरकारच्या माध्यमातून साकव बांधून घेतला होता.
त्यानंतर मोडकळीस आलेला साकव दुरूस्त करण्यासाठी येथील जनतेने दोन वर्षापुर्वी ग्रापंचायतमध्ये ठराव मंजुर करून त्याद्वारे संबंधित खाते, संबंधित लोकप्रतिनीधी यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे शाळकरी मुले आणि दैनंदिन व्यवहारासाठी ये जा करणा-या महिला-पुरूषांना जीव मुठीत घेऊन येणे जाणे करावे लागते.
प्रस्तुत प्रतिनीधींनी गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत उपसभापती श्री. मधुकर गायकर यांची वेळोवेळी भेट घेतली असता, लवकरच तुमच्या कामाला सुरूवात होईल असे केवळ आश्वासन देतात. प्रत्यक्षात मात्र कुठलेही काम होत नाही.
करीता, या मोडकळीस आलेल्या साकवामुळे कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून केलटे बौध्दवाडीतील तमाम कार्यकर्ते आमदार अनिकेतदादा तटकरे यांची भेट घेऊन साकडे घालणार आहेत.

إرسال تعليق