खरसईच्या अपघातग्रस्त नाक्ती कुटुंबाची राजिप अध्यक्षांनी घेतली भेट



म्हसळा दिघी पोर्टचा ट्रेलर घरात घुसल्याने घर उद्ध्वस्त झालेल्या म्हसळा खरसई येथील महादेव नाक्ती यांच्या कुटुंबाची राजिप अध्यक्षा आदिती तटकरे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे तसेच योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी संबंधीतांकडे बोलणी करण्याचा शब्दही दिला आहे . दिघी पोर्ट येथे अवजड वाहतूक करणारा भरधाव ट्रेलर म्हसळा खरसई येथील रहिवासी महादेव नाक्ती यांच्या घरात घुसून अपघात झाला होता . या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी महादेव नाक्ती यांचे राहते घर कोसळून संपूर्ण संसार उध्वस्त झाला आहे महादेव नाक्ती यांना दिलासा देण्यासाठी आणि योग्य ती मदत मिळविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली . अपघात झाल्या दिवसापासून दिघी पोर्टची कॉईल वाहतूक करणारे ट्रेलर बंद करण्यात आले आहेत . तसेच अपघातग्रस्त ट्रेलरही जैसे थे अवस्थेत आहे 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा