म्हसळ्यातील मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन मिशन झाले पोरके ; आम्हाला " ग्रामप्रवर्तक" द्या खरसई ग्रामस्थांची मागणी...



प्रतिनिधी : हेमंत पयेर

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन मिशन अंर्तगत राज्यात एक हजार गावांची निवड झाली. यामध्ये जिल्हयांतील १६ गांवे समाविष्ट आहेत. त्यामध्ये मा णगाव तालुक्यातील काकल, वडगांव, मुठवली तर्फे तळा, तळा तालुक्यातील शेणवली, चरणी ( खु), बोरघर हवेली, श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी, जसवली पोलादपूर तालुक्यातील कापडी खुर्द , बोरघर म्हसळा तालुक्यातील खरसई, संदेरी ,महाड तालुक्यातील बारसगाव, सावने, मोहोत व पाली तालुक्यांतील गावांचा या कार्यकमात समावेश आहे. म्हसळे तालुक्यातील खरसई व संदेरी या दोनही गावांतील प्रवर्तकांनी पुढील कालावधी साठी मुदत न वाढविल्यामुळे या दोनही गावचे मुख्यमंत्री फेलोशीप योजनेअंर्तगत होणारे कामकाज व पाठपुरावाथांबले आहे . याच उद्देशाने शेकाप युवा तालुका अध्यक्ष तथा खरसईचे माजी सरपंच निलेश मांदाडकर यानी ही पदे नव्याने तात्काळ भरावी अशी मागणी जिल्हाधीकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. 

ग्रामपरिवर्तकांच्या माध्यमांतुन ग्रामीण भागांतील विविध योजना , कौशल्य विकास कार्यक्रम,रस्ते, आरोग्य शिक्षण आदी योजनांचा पाठपुरावा करून गतीमान विकास करण्याचे स्वप्न रंगविले जात असे, आमचे ग्रामपंचायतीत या अनुषंगाने विकास झाला नाही, उर्वरीत कालावधीसाठी नव्याने नेमणूक व्हावी.
-निलेश मांदाडकर, माजी सरपंच , खरसई 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा