कोंझरी वरचीवाडी येथे कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते क्रिकेट उदघाटन...


प्रतिनिधी, कोंझरी
आज दि. ११ मे २०१८ रोजी कोंझरी वरचीवाडी येथे कर्जादेवी चषक २०१८ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते सकाळी १०. ०० वाजता करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित तालुका सरचिटणीस श्री. प्रकाश रायकर,तालुका उपाध्यक्ष श्री. गणेश बोर्ले ,ग्रामपंचायत सदस्य श्री.निगुडकर,गावाचे अध्यक्ष श्री.अजय धाडवे,श्री.सुरेंद्र शिगवण,श्री.दिनेश काप,श्री.मंगेश कापेकर,श्री.योगेश काप,श्री.सदानंद शिगवण,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करताना मार्गदर्शनपर मा.श्री.कृष्णा कोबनाक यांनी युवकांना संघटित होण्याचे आवाहन केले व क्रिकेट खेळता खेळता स्वतःच्या करिअरबाबत देखील विचार करण्याच्या सल्ला कोबनाक यांनी तरुणांना दिला. मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थ एकत्र आल्याने गावाकडे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होतो म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा मे महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. कुठलेही वाद न करता सदरची स्पर्धा यशस्वी व्हावी. असे आवाहन करून कर्जादेवी क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा