अभिनेते सयाजी शिंदे यांची शिस्ते गावाला भेट ; दिवेआगर, वेळास समुद्र किनाऱ्यांनी शिंदे यांना घातली भुरळ



बोर्ली पंचतन- अभय पाटील

मराठी, हिंदी तसेच दक्षिणेकडे चित्रपटसृष्टी मधील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावचे सरपंच रमेश घरत यांच्या निवासस्थानी भेट दिली रमेश घरत आणि अभिनेते असल्यानी शिंदे यांची खूप चांगली मैत्री असल्याने घरत यांचा मुलगा चिरंजीव आयुष याच्या 6 व्या वाढवसा निमित्त शुभाशीर्वाद देण्यासाठी खास ते आले होते .                  श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावचे सरपंच रमेश दत्ताराम घरत यांचे चिरंजीव आयुष रमेश घरत यांचा वाढदिवस होता. गेली दोन वर्षे पासुन सिने अभिनेता सयाजी शिंदे यांना श्रीवर्धन, दिवेआगर, शिस्ते , बोर्ली पंचतन गाव पहाण्यासाठी यायचे होते.  असे सरपंच घरत यांनी पत्रकारांस सांगितले आज घरत यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा योग साधीत त्यांनी शिस्ते गावास अचानक भेट दिली, आज रविवार दिनांक २७/०५/२०१८ रोजी सकाळी नऊ वाजता पत्नीसह शिस्ते गावात हजर झाले. त्यांच्या समवेत मराठी उद्योजक सुधीर बळीराम म्हात्रे, झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रसाठी पत्रलेखन करणारे लेेेखक निलेश पाथरे, तसेच इतरही मित्रमंडळींसह बोर्ली पंचतन गावाचे माजी सरपंच निवास गाणेकर व शाम नाक्ती होते, अभिनेते सयाजी शिंदे एका छोट्याशा गावामध्ये आपल्या मित्राच्या घरी भेट द्यायला आल्याने सर्वच आश्चर्य चकित झाले, जखमाता देवी मंडपी होळीच्या मैदानावर गाडी उभी करून सरपंच रमेश घरत यांच्या घरी आले. सरपंच चिरंजीव आयुष यांस शुभाशीर्वाद दिले. मराठी चित्रपट सुष्ठीतीलच नव्हेतर हिंदी चित्रपट सुष्ठीतील अभिनेता ते खलनायक अशी प्रभावी व उत्तम भुमिका बजावणारे मराठी सिने अभिनेता सयाजी शिंदे यांंना या पूर्ण दिघी पासून समुद्र किनाऱ्यावरील दिवेआगर, वेळास, कोंडविली, श्रीवर्धन परिसराने भुरळ घातली असून मी पुन्हा जुलै महिन्यात येऊन. कोकणातील विशेषतः श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचा मनमुराद आनंद व काही चित्रपट निर्मात्यांना हा भाग किती सुंदर आहे निश्चित सांगून चित्रपटाचे छायाचित्रीकरणासाठी नक्की येईन असे त्यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा