श्रीवर्धन नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम


श्रीवर्धन : सावन तवसाळकर

स्वच्छ भारत अभियान राबविण्यात अग्रणी असलेली श्रीवर्धन नगरपालिका आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याचे समोर आले आहे शहरातील सर्व गटारात व नाल्यांमध्ये कचरा व घाण साचली आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे त्याचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर होण्याची १ शक्यता आहे श्रीवर्धन नगरपालिका पर्यटनास चालना देण्यात अग्रणी आहे त्या दृष्टीने नगरपालिकेची वाटचाल देखील सुरु आहे शहरात आ . सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून मोठ्याप्रमाणात विकास होताना दिसत आहे . मात्र शहरातील जनतेस पायाभुत सुविधा देण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याचे या घाणीच्या  साम्राज्यावरून निदर्शनास येत आहे . श्रीवर्धन शहरातील दादरी पुलाखाली कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे मच्छिमार्केट , भाजी मंडई व रिक्षा स्टेंड परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गधी येते त्याचा त्रास विक्रेते , ग्राहक व स्थानिक रहिवाशी होत असल्याचे सांगण्यात येत आहे श्रीवर्धन नगरपालिकेच्या २०१७ - १८ च्या अर्थसंकल्पात ५० लाख ९९ हजार २४८रूपयांची तरतूद करण्यात आली आहे शहरातील गटारांची अवस्था पाहता ती उन्हाळ्यातच तुटुंब भरली आहेत . मात्र अद्याप या गटारांची साफसफाई झालेली नाही . जर काही दिवसात पावसाने हजेरी लावली तर ही गटारे ओव्हर फ्लो झाली तर रस्त्यावर हे दुर्गधी युक्त पाणी येईल व नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल . 

पावसाळ्यापूर्वीच गटारे तुंबली..
श्रीवर्धन शहरात पर्जन्याचे प्रमाण अधिक असते त्या दृष्टीने पावसाचे पाणी व शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटाराची बांधणी करण्यात आली आहे पावसाळा सुरू होण्यास एक महिना बाकी आहे अद्याप नगरपालिका प्रशासनाने आगामी काळात निर्माण होणाया पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व गटार दुरुस्ती केलेली नाही . श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौक , मुगल मोहल्ला , बाजार परिसर , पेशवेआळी , परीटआळी , पोतदार चाळ , हायस्कुल पाखडी , गांधी मैदान या सर्व ठिकाणची गटारे पावसाळ्या पुर्वीच तुंबली आ हेत . पर्यायाने या परिसरातील स्थानिकांच्या आरोग्यावर याचा अनिष्ट परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा