दिवेआगर : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यात गाळ मुक्त धरण व अभियान गाळ युक्त शिवार राबविण्यात येत आहे . सरकारी यंत्रणा धर्माधिकारी प्रतिष्ठान व जनता यांनी संयुक्तिक पणे तालुक्यातील विविध धरण प्रकल्पाचे गाळ मुक्तीचे काम हाती घेतले आहे . श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव खुजारे रानवली येथील जलस्रोत साफसफाई गाळ मुक्त झाली आहेत . तसेच वाळवंटी तलाव व मौजे कासार कोंड येथे काम प्रगती पथावर आहे कासार कोंड हे तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गाव आहे . या गावास टैंकर ने पाणी पुरवठा केला जात . डोंगराळ भागात गाव वसलेले आहे . या पूर्वी पावसाळी पडणाच्या पाण्याचे उपयोजन करण्यात सरकारी यंत्रणा व जनता यांना अपयश येते असे निदर्शनास आले आहे त्यामुळे या उपक्रमा अंतर्गत सदरच्या गावात सलग समतल चर खोदण्यांचा निर्णय सरकारी यंत्रणेने घेतला आहे डोंगराळ भागात चर खोदल्याम ळे जलस्रोत संवर्धन शक्य आहे पावसाळी पाणी चरा मध्ये अडून जल पातळी वाढू शकते . तसेच सभोवतालच्या जलस्रोतांना त्याचा विलक्षण फायदा होईल . व पेयजल व शेतीस पूरक पाणी उपलब्ध होऊ शकतो . सदर उपक्रमात स्थानिक लोक व डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या सभासदांनी श्रमदान केले आहे . त्या सोबत तालुक्यातील प्रांत , तहसील , पंचायत समिती व कृषी कार्यालयातील कर्मचारी प्रताधिकारी प्रवीण पवार , बी डी ओ हंभिर , श्री . रविदास जाधव , लक्ष्मण टकले , बाबासाहेब जाधव , रोहण निगुडकर लिपिक यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला आहे विद्यमान राज्यसरकार ने गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार या अभियाना अंतर्गत स्थानिक जनतेला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला आहे . शेती हा दर्जेदार उत्पादन देणारा व्यवसाय ठरू शकतो या अनुषंगाने शेतीस पूरक बाबींकडे लक्ष्य दिले ही महत्त्वाची बाब आहे कोकणात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे , जमीन कसदार आहे फक्त शेतीस योग्य भागभांडवल व साहित्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे
श्रीवर्धन तालुक्यातील - कासार कोंड हे गाव पाणी प्रश्ती महत्वाचे आहे येथे उन्हाळी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो . त्यामुळे आम्ही सदर गावाच्या हद्दीत सलग समतल चर खोदण्यांचा प्रयत्न केला आहे जेणे करून जलस्रोतांच्या पातळीत भविष्यात वाढ होईल . डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या सभासदांनी विशेष सहकार्य केले त्या बद्दल त्यांचे धन्यवाद .
- जयराज सूर्यवंशी , तहसीलदार श्रीवर्धन
कासार कोंड येथे सलग समतल चर खोदणे भविष्यकालीन दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे त्या कारणे पावसाळी पाण्याचा जमिनीत योग्य पद्धतीने निचरा होईल . पर्यायाने जलस्रोत पातळीत वाढ होईल . आंबा व सुपारी या दोन्ही पिकाच्या दृष्टीने पाणी अडवणे फायद्याचे ठरणार आहे.
- सुभाष घाडगे , कृषी अधिकारी श्रीवर्धन
إرسال تعليق