श्रीवर्धन - म्हसळ्यात गावोगावी ' मद्यशाला '


दिघी : गणेश प्रभाळे

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा देशी व इंग्लिश दारू विकण्याचा धंदे जोर धरू लागले आहेत . झटपट पैसे मिळवून देणारा धंदा अशी आता ओळख बनत आहे . त्यामुळे या दारुधंद्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरीत आहे . पूर्वी शहराच्या बाहेर नागरी वसाहतीपासून दूर एखादे दारूचे दुकान असायचे , पण आता गावोगावी दारूचे दुकान वा बार हमखास दिसतो . ते नव्हे तर गावात घरातून लपून धंदा केला जातोय . विशेष म्हणजे बेकायदा बियर व वाईनची विक्री राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्यांच्या दुर्लक्षाने बोकाळत चालली आहे याबाबतची वर्दी मिळाल्यानंतरही उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र कारवाईत हात आखडते घेतले जातात . श्रीवर्धन तालुक्यातील दियी , दिवेआगर , वडवली , वेळास दांडगुरी , भरडखोल तर स्हसळा तालुक्यातील मेंदडी , पाबरे , म्हसळा तसेच कोळे अशा गावांत घराघरातून बेकायदा बिअर , वाईन व व्हिस्की विक्री होते . तालुक्यातील ग्रामकुटासा येथे तरुण वर्ग व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणात वळत आहे . आजची ९० टक्के तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता याला जबाबदार तरी कोण ? असा प्रश्न असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे 


गोवा बनावट दारू...
श्रीवर्धन तालुका हा पर्यटकसाठी प्रसिद्ध आहे . मे महिना असल्याने मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात . अशा पर्यटकांना पटकन दारू देण्यासाठी खाजगी खानावळ किंवा हॉटेल मालक गोवा बनावटची दारू साठा ठेवतात हा साठा कुन येतो ? याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अल्पवयीन मले ही दारूच्या आहारी...
छुप्या पद्धतीने मिळत असल्याने अल्पवयात मद्याची चव चाखलेली मुले तरुणपणी ताणतणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी दारूच्या आहारी गेलेली आढळतात . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा