म्हसळा गृप ग्राम पंचायत मांदाटणे या ग्रामपंचायतींची ग्राम सभा दिनांक ११ ऑगस्ट २०१७ रोजी मांदाटणे येथे झाली या ग्रामसभेचे अध्यक्ष वरिष्ठ श्रीपत मनवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेत पाणदरे गावचे वरिष्ठ समाज सेवक श्री शंकर रामजी गोरिवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली गोरिवले यांचा या पंचक्रोशीत चांगला संपर्क आहे आणि लोक जनजागृती तसेच जनसंपर्क चांगला आहे म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली या आधि श्री काशिराम पवार हे ९ वर्ष अध्यक्ष होते. यावेळी मांदाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती सुशीला पवार, भिकु डोंगरे , चंद्रकांत पवार, संगिता काते, आशा गोरिवले , नमिता शिगवण , माधुरी धोकटे , ग्रामसेवक ठाकरे , शांताराम खैरे, प्रकाश लाड , सुरेश कदम, आत्माराम धुमाळ वनपाल सुधिर म्हात्रे , अतुल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते गोरिवले यांची अध्यक्षपदी निवड होताच संपूर्ण परिसरात आनंदाच वातावरण आहे
शंकर रामजी गोरिवले यांची मांदाटणे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड.
Admin Team
0

إرسال تعليق