राजीप शाळा रुद्रवट झाली डिजिटल...

 १५ ऑगस्ट २०१७ च औचित साधून रा.जि.प शाळा रुद्रवट येथे डिजिटल शाळेचे  उदघाटन.
रुद्रवट गावासाठी ""सुवर्ण दिवस " ३९ वर्ष पूर्ण झाली, या निमित्त गावातील सर्व माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी यांचे मदतीने आज शाळेला कॉम्पुटर, प्रिंटर, एल सी डी प्रोजेक्टर इत्यादि शिक्षण उपयोगी साहित्य देण्यात आले
सर्व ग्रामस्थ महिला मंडळ, युवक मंडळ क्रीडा मंडळ आजी माजी शिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले.
 


सुमारे ९५ विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला ,घुमेश्वर आणि रुद्रवट येथिल सर्व अंगणवाडी ते पदवीधर विद्यार्थी याना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले सर्व केंद्र शिक्षक ,ग्रामस्थ, उच्च अधिकारी हजर होते
श्री विनोद रटाटे - माजी विद्यार्थी आणि पूर्व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले,मुंबई अध्यक्ष अंनता आग्रे ,संतोष बोर्ले,राजेश रटाटे,गणेश आग्रे व ग्रामस्थ मोठ्या संखेनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे साहेब, पंचयत समिती उप सभापती मधुकर गायकर,कुणबी समाज सरचिटणीस महेश शिर्के, शिक्षण प्रेमी श्री सतिश शिगवण, यांचे हस्ते करण्यात आले केंद्र प्रमुख मांडवकर साहेब
पत्रकार महेश पवार, मुकेश बेटकर सर केंद्रात सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा